विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहिल्यानगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा तसेच, प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. या विभागातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी संघटना या सर्वांनी या वेबसाईटवरील माहीती पहावी. वेबसाईटवर केद्रींय माहितीचा अधिकार २००५ अन्वये कार्यालयाने जाहीर करावयाची माहीती व इतर सर्व माहीती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्य काळामध्ये सर्व विभागीय कार्यालय या वेबसाईटच्या माध्यमातून या कार्यालयाशी जोडले जातील या दृष्टीने कार्यवाही करण्याचा आमचा मानस आहे. आपण आमच्या वेबसाईटवर जावून माहीती घ्यावी, असे मी आपणांस आवाहन करीत आहे. तसेच आपले मौलीक विचार, सूचना केल्यास त्याचे आम्ही निश्चितच स्वागत करु, नजिकच्या काळात आपणाकडून प्राप्त झालेल्या व्यावहारिक सूचनांचा अंतर्भाव या वेबसाईटवर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. .
प्रादेशिक विभाग प्रमुख (पुणे,अहिल्यानगर व सोलापुर)
उच्च माध्यमिक विभाग, वाणिज्य ,शिष्यवृत्ती प्रमुख
माध्यमिक विभाग प्रमुख.
लेखा विभाग प्रमुख
आस्थापना विभाग प्रमुख.
###### प्रमुख
####### प्रमुख
###### प्रमुख.
##### प्रमुख