1) १) वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती करण्यासाठी रू.५०००००-०० पेक्षा जास्त रकमेचे देयके तपासून मिळणे बाबत....

शिक्षण उपसंचालक पुणे विभाग.

खरे बौध्‍दिक शिक्षण हे शरीरावयवांच्या - हात, पाय, डोळे, नाक इत्यादींच्या योग्य वापरातूनच होऊ शकते. म्हणून मुलाच्या शिक्षणाला प्रारंभ करताना त्याला एखादा उपयुक्‍त असा हस्तव्यवसाय शिकविणे व तद्‍द्वरा उत्पादन करण्याची क्षमता त्याच्या मध्ये निर्माण करने याला मी प्राधान्य देईन ..... महात्मा गांधी


शालेय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या अधिनस्त कार्यरत असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे, हे कार्यालय १७, डा.आंबेडकर मार्ग, पुणे-१ येथे स्थित आहे. महाराष्‍ट्र राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे हे कार्यालय निर्माण केलेले आहे.

शासनाच्या मह्सूल विभागाचा विचार करता पुणे मह्सूल विभागातील पुणे व सोलापुर व नाशिक मह्सूल विभागातील अहमदनगर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , निरंतर शिक्षण व आध्यापक विदयालय या संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या मदतीने पार पाडले जाते.


शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा